काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे - खा.शोभा बच्छाव
नाशिक, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। - सातपूर विभागामध्ये काँग्रेस सत्तेचा अनेक विकास कामे झाली स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षामुळे औद्योगिक वसाहत सातपूर व अंबड भागात आले. हजारो कामगारांना रोजगार मिळाला तसेच महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर काँग्रेस सत
काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे -  खा.शोभा बच्छाव


नाशिक, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।

- सातपूर विभागामध्ये काँग्रेस सत्तेचा अनेक विकास कामे झाली स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षामुळे औद्योगिक वसाहत सातपूर व अंबड भागात आले. हजारो कामगारांना रोजगार मिळाला तसेच महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर काँग्रेस सत्तेत असताना रुग्णालय पूल रस्ते तसेच सातपूर भागातील अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावी व विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जावे नक्कीच यावेळी सातपूर भागामध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल असे प्रतिपादन खासदार शोभा बच्छाव यांनी केले.नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामांचा वर्षाव काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे जनतेने सतर्क राहून आपल्या मतदानाचा हक्क योग्य तो बजवावा अशी आशा खासदार शोभा बच्छाव यांनी व्यक्त केली.सातपूर येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये खासदार शोभा बच्छाव बोलत होत्या.प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव व प्रभारी श्रुती म्हात्रे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागात प्रभाग समिती व बूथ यंत्रणा उभारण्यात येईल काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने पक्षाची विचारधारा घेऊन दिलेल्या उमेदवारांचा प्रचार चोखंदळ पद्धतीने करावा, निवडणुकीमध्ये होणारा मत चोरीचा प्रकार आता नागरिकांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे सत्ताधारी पक्षाला दूर ठेवण्यासाठी मतदार राजा हा काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहील व राहुल गांधींच्या लढाईमध्ये पक्षाला मजबूत करण्याचे काम पदाधिकारी करतील असे मत व्यक्त केले. लवकरच सर्व प्रभागांमध्ये प्रभाग समित्यांची निर्मिती पण होईल असे म्हात्रे यांनी सांगितले.नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येईल वेळ पडल्यास काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढायला तयार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आघाडी झाल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांचा मान सन्मान व समान प्रतिनिधित्व मिळाले तर पक्ष आघाडी करेल अथवा स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय आहे. असे सांगितले. सातपूर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा माया काळे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. सातपूर ब्लॉक मध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील अशी आशा माया काळे यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande