सांगवी बेनक, मुखेड भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर!
नांदेड, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील श्री क्षेत्र खंडोबा मंदिर देवस्थान, सांगवी बेनक ता. मुखेड येथे श्री गुरुवर्य खंडेश्वर महाराज यांच्या अनुष्ठान व्रत निमित्त आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास भाजप आमदार
अ


नांदेड, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।

मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील श्री क्षेत्र खंडोबा मंदिर देवस्थान, सांगवी बेनक ता. मुखेड येथे श्री गुरुवर्य खंडेश्वर महाराज यांच्या अनुष्ठान व्रत निमित्त आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास भाजप आमदार तुषार राठोड यांनी भेट देऊन संवाद साधला.

आरोग्य तपासणीसह रक्तदानासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमाद्वारे समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या सर्व आयोजकांचे व सेवेसाठी प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचे आमदार राठोड यांनी कौतुक केले.

याप्रसंगी भाजपा मुखेड विधानसभा प्रमुख खुशालराव पाटील उमरदरीकर, लक्ष्मणराव पाटील खैरकेकर, व्यंकटराव लोहबंदे, गंगाधर पिटलेवाड, मनोज कांबळे, संगमेश्वर देवकत्ते, गजानन पत्की, संतोष केंद्रे, बाळू नाईक जुन्नेकर, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व समस्त गावकरी मंडळी आणि माता-भगिनी आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande