कळवणमध्ये शिवसेनेचा रस्ता रोको, त्या आरोपीचा एन्काऊंटर करा महिला आघाडीची मागणी
कळवण, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। - शिवसेना व शिवसेना महिला आघाडी कडून कळवण बस स्थानकासमोर रास्तारोको करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख सत्यवती आहेर यांनी नराधमास फाशी देण्याऐवजी त्याचा एन्डकाउंटर करावा ही मागण
कळवणमध्ये शिवसेनेचा रस्ता रोको, त्या आरोपीचा एन्काऊंटर करा महिला आघाडीची मागणी


कळवण, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।

- शिवसेना व शिवसेना महिला आघाडी कडून कळवण बस स्थानकासमोर रास्तारोको करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख सत्यवती आहेर यांनी नराधमास फाशी देण्याऐवजी त्याचा एन्डकाउंटर करावा ही मागणी प्रशासनाकडे केली. तो काही अतिरेकी नाही, त्याला पोलीस कष्टडीत ठेवून कोणती माहिती गोळा करत आहे ,अशा नराधमाचा एन्काऊंटर करणे हाच पर्याय महत्वपूर्ण ठरेल, तसेच चिमुरडीच्या कुटुंबाला ही न्याय मिळेल. उपजिल्हाप्रमुख जितेंद्र पगार तालुकाप्रमुख शरद पगार यांनी आपले मनोगत व्यक्त केले, प्रशासने याप्रकरणी व दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा असे सांगितले. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे व महसूल प्रतिनिधी, मंडल अधिकारी विलास पगार यांना निवेदन देण्यात आले उपजिल्हाप्रमुख जितेंद्र पगार, तालुकाप्रमुख शरद पगार, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख साक्षी आहेर शिवसैनिक व महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande