बीडमध्ये थंडी वाढली; पहिल्यांदाच किमान तापमान १२ अंशांवर
बीड, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। गेल्या १५ दिवसांपासून बीड जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. सध्या किमान तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. मागील ३ वर्षांत नोव्हेंबर महिन्यात
बीडमध्ये थंडी वाढली; पहिल्यांदाच किमान तापमान १२ अंशांवर


बीड, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। गेल्या १५ दिवसांपासून बीड जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. सध्या किमान तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. मागील ३ वर्षांत नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदाच तापमान एवढ्या खाली गेले आहे. पुढील आठवडभर थंडीचा जोर कायम राहणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.पावसाची शक्यता नगण्य आहे. यामुळे शेती पिकांवर, विशेषतः भाजीपाला आणि फळबागांवर थंडीचा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रात्रीचे किमान तापमान महिन्याच्या सुरुवातीला १९ ते २२ अंशांच्या दरम्यान होते. नोव्हेंबरच्या मध्यापासून ते महिन्याच्या शेवटी लक्षणीय घट झाली. पारा सुमारे १२ ते १३ अंशापर्यंत खाली आला, ज्यामुळे थंडीचा कडाका वाढला. गेल्या दोन आठवड्यांत दिवसाचे कमाल तापमान २७ अंश सेल्सियस ते ३० दरम्यान असले तरी रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी पारा झपाट्याने खाली उतरत आहे.

प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने थंडी वाढीला फायदा होत आहे. पुढील आठवडभर थंडीचा जोर कायम राहणार आहे

गहू, हरभरा या रब्बी पिकांसाठी ही थंडी फायदेशीर असली तरी भाजीपाला आणि फळबागांवर मात्र याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दवबिंदूमुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande