लातूर : उदगीर येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी काँग्रेस पक्षात सामील
लातूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। उदगीर नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाला बळकटी देणारी मोठी घडामोड घडली आहे. बाभळगाव निवासस्थानी आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद चंद्र पवार) प्रदेश कार्
अ


लातूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। उदगीर नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाला बळकटी देणारी मोठी घडामोड घडली आहे. बाभळगाव निवासस्थानी आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद चंद्र पवार) प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, उदगीर शहर युवक अध्यक्ष अजय शेटकर, उदगीर तालुका युवक अध्यक्ष कृष्णा घोगरे, कपिल समगे, ओम काळा, बंटी कद्रे, मनोज हावा, बसवराज शेटकर या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या तरुण कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे उदगीर शहर आणि तालुक्यातील काँग्रेस संघटना अधिक मजबूत झाली असून, होऊ घातलेली नगरपरिषद निवडणूक आणि आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

उदगीर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष बिराजदार यांचेही याप्रसंगी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कल्याण पाटील, उदगीर नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेतील काँग्रेसचे निरीक्षक रवींद्र काळे, तसेच माधव कांबळे पद्माकर उगिले ज्ञानोबा गोडभरले विजयकुमार चवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

----------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande