'ही' तर कार्यकर्त्यांची भावना - एकनाथ शिंदे
सोलापूर, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)। महायुतीत असूनही भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना धाराशिवच्या शिवसैनिकांनी बोलून दाखवली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना ‘ह्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना असता
Eknath Shinde


सोलापूर, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)। महायुतीत असूनही भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची भावना धाराशिवच्या शिवसैनिकांनी बोलून दाखवली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना ‘ह्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना असतात’ असे म्हटले आहे.

निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो म्हणजे मित्राचे शत्रू झालो, असे नाही. आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच आहे आणि तोच राहणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोल्याच्या दौऱ्यावर आहेत.

सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाष्य केल्याचे मानले जात आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande