
छत्रपती संभाजीनगर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।फुलंब्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ करण्यात आला.
फुलंब्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ खासदार भागवत कराड व आमदार अनुराधा ताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
प्रचारदरम्यान नागरिकांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुहास शिरसाठ यांच्याशी थेट संवाद साधला. स्थानिक पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा आणि परिसर विकास यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दिसून आलेला विश्वास यामुळे उमेदवारांचा उत्साह अधिक वाढला.
प्रचार शुभारंभ केवळ औपचारिकता न राहता लोकांशी नाळ जुळवण्याचा, त्यांचा आवाज ऐकण्याचा आणि विकासासाठी खऱ्या अर्थाने बांधिलकी जपण्याचा दिवस ठरला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis