गृहनिर्माण संस्थांना बल्क वेस्ट जनरेटर प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे बंधनकारक
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरात दररोज १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना (बल्क वेस्ट जनरेटर) प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे बंधनकारक केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने प्रकल्प बंद आहेत, असे महापालिके
गृहनिर्माण संस्थांना बल्क वेस्ट जनरेटर प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे बंधनकारक


पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।

शहरात दररोज १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना (बल्क वेस्ट जनरेटर) प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे बंधनकारक केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने प्रकल्प बंद आहेत, असे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रकल्प बंद असलेल्या संस्था व सोसायट्यांचे आता सर्वेक्षण करून त्यांना कचरा प्रक्रिया प्रकल्प तत्काळ सुरू करण्याचे महापालिकेने सांगितले आहे.

शहरातील मोठ्या आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी, मंगल कार्यालये आणि मोठ्या गृहनिर्माण संस्था, अशा १०० किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या संस्था, आस्थापना, गृहनिर्माण संस्था, हॉटेल, रेस्टॉरंट यांना २००० मधील बांधकाम नियमावलीनुसार ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत बंधनकारक केले होते. शहरातील एक हजार ९४२ आस्थापनांमध्ये दररोज २० टनांहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande