
बीड, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
बीड शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी बीड पालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. सुभाष रोड, बस स्टैंड, साठे चौक, माळीवेस या भागांतील ४० अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आला. यामध्ये हातगाड्या, पत्र्याचे शेड, ओटे हटवण्यात आले.
ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख एपीआय सुभाष सानप, आदिनाथ मुंडे, संजय टुले, चिंतामण शिंदे, राहुल घाडगे, संतोष मोरे, नारायण वाघमारे यांच्यासह पथकप्रमुख मुन्ना गायकवाड, सुजित जाधव, विकी दांगट, जावेद शेख, शरद खुपसे, राम रोकडे, किरण शिंदे, लखन साबळे यांनीही मोहीम राबवली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis