सोलापूरात सोनाराच्या बाथरूममध्ये चांदीची बादली, आयकर विभागाचा सराफ आणि बिल्डर्सवर छापा
सोलापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापुरात गेल्या तीन दिवसांपासून सराफ आणि बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकले जात आहेत. आयकर विभागानं या छाप्यात अनेक उद्योजकांवर कारवाई केलीय. इतर राज्यातले आणि जिल्ह्यातले अधिकारी या छाप्यात सहभागी असून कसून चौकशी क
सोलापूरात सोनाराच्या बाथरूममध्ये चांदीची बादली, आयकर विभागाचा सराफ आणि बिल्डर्सवर छापा


सोलापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।

सोलापुरात गेल्या तीन दिवसांपासून सराफ आणि बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकले जात आहेत. आयकर विभागानं या छाप्यात अनेक उद्योजकांवर कारवाई केलीय. इतर राज्यातले आणि जिल्ह्यातले अधिकारी या छाप्यात सहभागी असून कसून चौकशी केली जात आहे. एका सराफ व्यावसायिकाच्या बाथरूममध्ये चांदीची बादली सापडल्याची माहिती समोर येतेय.

आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकण्यासाठी सुरुवातीला सराफाच्या निवासस्थानी पाहणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकासह छाप्यासाठी दाखल झाले. छाप्यावेळी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. ५० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

आयकर छाप्यावेळी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात केलंय त्यांनाही कल्पना दिली नव्हती की कुठं आणि कशासाठी बंदोबस्त असणार आहे. थेट गाडीतून छाप्याच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना माहिती दिली गेली. अचानक पडलेल्या छाप्यानं सराफ व बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande