खडकवासल्यातून येणारे पाणी आता कालव्यातून येणार!
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला खडकवासला धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या ३ हजार मिमी व्यासाच्या जलवाहिनीची पालिका दुरुस्ती करणार आहे. दुरुस्तीसाठी जलवाहिनी बंद ठेवल्याने पर्वती जलकेंद्रासाठी महापालिका पुन्हा कालव्यातून पाणी घे
खडकवासल्यातून येणारे पाणी आता कालव्यातून येणार!


पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला खडकवासला धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या ३ हजार मिमी व्यासाच्या जलवाहिनीची पालिका दुरुस्ती करणार आहे. दुरुस्तीसाठी जलवाहिनी बंद ठेवल्याने पर्वती जलकेंद्रासाठी महापालिका पुन्हा कालव्यातून पाणी घेणार आहे.पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची पालिका दुरुस्ती करणार आहे. ही बंद जलवाहिनी १९९९ मध्ये जुन्या कलव्यातून टाकली आहे. ही जलवाहिनी आतून खराब झाली असून, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला आहे.

अनेक ठिकाणी जलवाहिनीत गळती होत आहे. पालिकेकडून हे काम पुढील काही दिवसांत हाती घेतले जाणार आहे. हे काम सुरू झाल्यानंतर पर्वती जलकेंद्रातून केला जाणारा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.महापालिका खडकवासला धरणातून १९९९ पूर्वी कालव्यातून पाणी घेत होते. त्यामुळे वर्षाला दोन ते तीन टीएमसी पाण्याची कालव्यातून गळती होत असे. तसेच त्याचे पैसे पालिकेला द्यावे लागत होते. त्यामुळे पालिकेने १९९९ मध्ये ३००० मिमी व्यासाची बंद जलवाहिनी टाकली.

त्यानंतर २०१७ मध्ये २५०० मिमी व्यासाची आणखी एक जलवाहिनी टाकली. त्यानंतरपालिकेने कालव्यातून पाणी उचलणे बंद केले. १९९९ मध्ये टाकलेल्या जलवाहिनीस २५ वर्षे पूर्ण झाली असून, ती आतमधून खराब आहे. त्यामुळे ती दुरुस्त केली जाणार आहे. या कामासाठी सुमारे ५७ कोटींचा खर्च अपेक्षित असून स्थायी समितीने नुकतीच ३२ कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. पुढील काही महिन्यात पालिका या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे. हे काम जलवाहिनीच्या आतील बाजूस केले जाणार असल्याने ते टप्प्याटप्प्याने होणार आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande