लातूर : बालहृदय तपासणी शिबिरात ११८ बालकांची तपासणी
- ३३ जणांची मोफत शस्त्रक्रिया हदय शस्त्रक्रिया करण्यात येणार लातूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात -हदयाचे आजार असलेल्या बालकांची २-डी इको तपासणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदचे मुख्य
लातूर : बालहृदय तपासणी शिबिरात ११८ बालकांची तपासणी


- ३३ जणांची मोफत शस्त्रक्रिया हदय शस्त्रक्रिया करण्यात येणार

लातूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात -हदयाचे आजार असलेल्या बालकांची २-डी इको तपासणी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली येथील लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालय येथे करण्यात आली.या शिबिरात जिल्ह्यातील एकूण ११८ बालकांची तपासणी करण्यात आली असून सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल पुणे येथे ३३ बालकांवर मोफत -हदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र भालेराव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. आनंद कलमे यांच्या नेतृत्वात्वाखाली -हदयाचे आजार असलेल्या बालकांची २-डी इको तपासणी करण्यात आली. ही तपासणी सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल पुणे येथील लहान मुलांचे सुप्रसिद्ध बाल-हदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर या विशेषतज्ज्ञामार्फत पार पडले.

राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने लातूर जिल्ह्यातील ३० आरोग्य पथकांद्वारे वर्षातून २ वेळा अंगणवाडीतील व १ वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. शुन्य ते १८ या वयोगटातील बालकांची ४-डी म्हणजे जन्मत: व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शारिरीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतात.

तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत शुन्य ते ६ वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकासवाढीचा अभाव आढळल्यास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया, औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे. या शिबिरासाठी आरबीएसके जिल्हा समन्वयक अमोल झेंडे, डीईआयसीचे व्यवस्थापक अलीम नदाफ, राजेंद्र सोनकांबळे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी व आरबीएसके पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande