फुलंब्रीत विचारांचा वारसा जपत इतिहास घडविण्याच्या वाटचालीची वर्षपूर्ती!
छत्रपती संभाजीनगर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील मतदार बांधवांनीही प्रथमच एका महिलेला आपलं कर्तृत्व आणि ओळख निर्माण करण्याची संधी दिली. घरातील जबाबदाऱ्यांबरोबर उंबरठा ओलांडून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची ही संधी
अ


छत्रपती संभाजीनगर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील मतदार बांधवांनीही प्रथमच एका महिलेला आपलं कर्तृत्व आणि ओळख निर्माण करण्याची संधी दिली. घरातील जबाबदाऱ्यांबरोबर उंबरठा ओलांडून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची ही संधी देणं हा आपला माझ्यावरचा विश्वास होता, असे भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांनी सांगितले.

या विश्वासाला पात्र ठरत दिलेली वचने पूर्ण करणे आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पितपणे कार्य करणे ही फार मोठी जबाबदारी होती.

ही जबाबदारी पार पाडताना आपण केलेल्या अनेक कामांपैकी काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे -

देवगिरी सहकारी साखर कारखाना - १४ वर्षे बंद असलेल्या कारखान्याला पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले यामुळे हा कारखाना आज पुन्हा नव्याने सुरू झाला आहे.

समृद्ध पंचायतराज अभियान या अभियानाची राज्यभरातील सुरुवात आपल्या किनगावातून झाली ही फुलंब्रीसाठी अभिमानाची बाब ठरली.

शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी परिषद आयोजित करून शिक्षकांना नवीन संकल्पनांची ओळख करून दिली.

विधानसभेत प्रश्न मांडणी - रुग्णालय, कुपोषण, अमृत आहार योजना अशा महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने विधानसभेत आवाज उठवला.

बनावट एनए प्रकरण - गट क्रमांक १७ मधील फसवणूक प्रकरणात पाठपुरावा करून १५९ प्लॉट धारकांना नव्या डीपी प्लॅनमधून दिलासा मिळवून दिला.

CRF रस्ता मंजुरी - देवगिरी कारखाना ते गौर पिंपरीपर्यंत २१ किमी रस्त्यासाठी २५ कोटींचा CRF निधी मंजूर करून घेतला.

वाकोद प्रकल्प - वाकोद प्रकल्पातील वितरण प्रणाली बंधनलिकेद्वारे करण्यासाठी ४० कोटींचा निधी मिळवला.

पिंपळगाव वळण प्रकल्प - कोल्हापुरी बंधाऱ्याचे निम्नपातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्यासाठी ३० कोटींची मंजुरी मिळवली ज्यामुळे सिंचनक्षेत्र वाढणार आहे.

कार्यान्वित महिलांसाठी वसतिगृह - केंद्र सरकारच्या माध्यमातून कार्यान्वित महिला यांच्यासाठी २२ कोटी रुपयांच्या निधीतून वसतिगृहाची निर्मिती होत आहे.

व्यापारी संकुल - चिकलठाणा येथे व्यापारी संकुलाच्या निर्मिती करिता आपण सातत्याने प्रयत्न केला यातून १० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली.

घनकचरा व्यवस्थापन - चिकलठाणा येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आधुनिक व्यवस्थापन यंत्रासाठी १० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली.

मतदारसंघाच्या एकंदर विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण, रोजगार, स्थानिक विकास, पायाभूत संरचना, शेती, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा विविध क्षेत्रात मोलाची भर घालण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे.असे त्यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande