
सोलापूर, 23 नोव्हेंबर, (हिं.स.)।
शहरातील बाळवीस येतील श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये मानाच्या पहिल्या नंदी ध्वजाची नागफणीचे मानकरी सोमनाथ मेंगाने व सुधीर थोबडे यांच्या हस्ते विधीवत पूजन करून सरावास सुरुवात करण्यात आली. यावेळी राजू स्वामी ,शिवयोगी होळीमठ , शांतेश्वर स्वामी, निलाआप्पा वाले यांनी पौराइत्य केले.
यावेळी श्री सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, जगदीश हिरेहबू, मनोज हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू यांच्यासह, जयप्रकाश अमनगी, राजेश अमनगी , राजू भैरवपाटील, विजय भोगडे, रवी कोरे, योगीनाथ कुर्ले , अशोक वाले गंगाधर कल्याणकर ,सोमनाथ सरडे, सागर स्वामी ,सागर हुमनाबादकर प्रथमेश हिरेहबू, शिवराज कडगंची , यांच्यासह सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड