
कोल्हापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। एनसीसी गट (मुख्यालय) कोल्हापूरतर्फे ७८ वा एनसीसी स्थापना दिवस २२ व २३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील सर्व युनिट्स आणि शैक्षणिक संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.एनसीसीची शिस्त, नेतृत्व गुण व समाजाभिमुखता या मूल्यांना पुनः अधोरेखित करण्यासाठी यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी सर्व बटालियन, संस्थां मध्ये एनसीसी डे परेड, ध्वजारोहण, एनसीसी गाण्याचे सादरीकरण आणि प्रतिज्ञाविधी तसेच सार्वजनिक ठिकाणे,शाळा व युद्ध स्मारकांमध्ये स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविण्यात आले.
त्याचबरोबर निबंध, वादविवाद, प्रश्नमंजुषा आणि पोस्टर-मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी वरील उपक्रमांसह समुद्र किनारी व जलसंपन्न भागांत विशेष स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण व सागरी परिसंस्थेबाबत जनजागृती केली. या ७८ व्या दिनानिमित्ताने ब्रिगेडियर आर.के.पैठणकर,गट कमांडर,एनसीसी गट मुख्यालय कोल्हापूर येथील सर्व अधिकारी,प्रशिक्षक कर्मचारी,एएनओ यांनी सहभागी सर्व एनसीसी कॅडेट्सचे विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar