नांदेड : लोहाचे माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी यांचा भाजपमध्ये प्रवेश
नांदेड, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड येथे माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आणि अमरनाथ राजूरकर भाजपा नेते एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत लोहा येथील माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी यांचा भारतीय जनता पक्षांत पक्ष प्रवेश
अ


नांदेड, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। नांदेड येथे माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आणि अमरनाथ राजूरकर भाजपा नेते एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत लोहा येथील माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी यांचा भारतीय जनता पक्षांत पक्ष प्रवेश झाला. यावेळी पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोह्याचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केल्याबद्दल नक्कीच लोहा मध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार आहे आणि लोहा नगरपालिकेमध्ये गजानन सावकार सूर्यवंशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बहुमताने व सर्व नगरसेवक बहुमताने विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande