
नांदेड, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. नांदेड शहरातील बैठकीस ते उपस्थित राहिले त्याचप्रमाणे त्यांनी
सहयोग सेवाभावी संस्था यांच्या इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, विष्णूपुरी, नांदेड येथे भेट दिली..
राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेअंतर्गत या शाळेमध्ये धनगर समाजातील ४८० विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांशी मंत्री सावे यांनी थेट संवाद साधला
संस्थेचे सचिव डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis