
मुंबई, २३ नोव्हेंबर (हिं.स.) : पीए अनंतच्या पत्नीने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढत निवेदन देण्यात आले आहे.
यात म्हटले आहे की, काल 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 ते 6.45 वा. सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला . तो खूप रडत होता . पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठीही खुप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसुर राहु नये व त्यांनी योग्य तपास करुन या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे, तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडीलांशीही मी बोलले, ते प्रचंड दु:खात आहेत हे मी समजु शकते. अश्या घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अति वैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे.अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी