पुणे महापालिकेला मतदार यादी विक्रीतून १० लाखांचा महसूल!
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन मतदार यादी डाऊनलोड करण्यास येणाऱ्या अडचणी कायम आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना नाइलाजास्तव मतदार यादीची प्रत महापालिकेकडून विकत घ्यावी लागत आहे. गेल्या तीन दिवसात महापालिकेला य
पुणे महापालिकेला मतदार यादी विक्रीतून १० लाखांचा महसूल!


पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन मतदार यादी डाऊनलोड करण्यास येणाऱ्या अडचणी कायम आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना नाइलाजास्तव मतदार यादीची प्रत महापालिकेकडून विकत घ्यावी लागत आहे. गेल्या तीन दिवसात महापालिकेला यातून १० लाख ४९ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, आत्तापर्यंत मतदार यादीतील घोळावर प्रशासनाकडे ९१ हरकती आल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ४१ प्रभागांमध्ये एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ मतदार असून, यामध्ये सूस–बाणेर–पाषाण हा प्रभाग सर्वाधिक म्हणजे तब्बल १ लाख ६० हजार मतदार आहेत. या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याने त्यावर २७ नोव्हेंबर पर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत.

ऑनलाइन मतदार यादी मोफत उपलब्ध करून दिली आहे, पण ती डाऊनलोड होत नाही. त्यावर मतदारांचे फोटो दिसत नाहीत अशा अडचणी आहेत. त्यामुळे निवडणूक शाखेकडे मतदार यादीची प्रत मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांना पैसे भरावे लागत आहेत. सर्वात महाग मतदार ४० हजार २६६ रुपयांची यादी ही प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर–आंबेगाव–कात्रजची आहे. प्रभाग २६ ची मतदार यादी सर्वात स्वस्त असून तिची किंमत ११ हजार ११८ रुपये एवढी आहे. जर प्रभाग एक ते प्रभाग ४१ या सर्व प्रभागांची मतदार यादी घ्यायची असेल तर त्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये मोजावे लागत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande