
लातूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।रेणापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीनिवास आकनगिरे यांच्यासह अनेकांनी भाजपाचे नेते आ.रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
भाजपाचे नेते आ.रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून रेणापूर शहरासह संपूर्ण लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गावागावात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून विकास कामांना गती दिली आहे . विकास निधी काय असतो विकास कामे काय असतात हे केवळ रमेशआप्पांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला उमजले आहे. होत असलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन मतदार संघातील अनेक जण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत.
रेणापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून तब्बल 80 ते 90 कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाल्याने नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे. निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रेणापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीनिवास अकनगिरे यांच्यासह सुरेश उरगुंडे, भास्कर तेरकर, अमर आकनगिरे, शुभम भांबरे, अमोल मद्दे, अनिल मामडगे, गंगाधर आकनगिरे, विनोद चन्नागिरे, सुशांत वंगाटे यांच्यासह अनेकांनी भाजपाचे नेते आ.रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, भाजपाचे मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले यांच्यासह अनेक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis