
ठाणे, 23 नोव्हेंबर, (हिं.स.) - ठाणे जिल्ह्यात दि. २३ नोव्हेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test – TET) २०२५ अत्यंत सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली संनियंत्रण व देखरेखीची सर्व कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यात आली.
उमेदवारांची उपस्थिती
पेपर-I
नोंदणी : ७७४३
उपस्थित : ७१५३
अनुपस्थित : ५९०
पेपर-II
नोंदणी : ९१७१
उपस्थित : ८४३१
अनुपस्थित : ७४०
परीक्षा केंद्रांची माहिती
पेपर-I साठी केंद्रे : २५
पेपर-II साठी केंद्रे : ३२
मनुष्यबळाची नियुक्ती
झोनल अधिकारी : ०८
सहाय्यक व परिरक्षक : ५७
पर्यवेक्षक, समवेक्षक, विशेष शिक्षक, लिपिक, शिपाई : एकूण ९५०
पोलीस मनुष्यबळ : १२५
कॅमेरामन : ४१
नियोजन आणि संनियंत्रण
जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करून प्रत्येक परीक्षा केंद्राशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला. राज्य कार्यालय आणि जिल्हा संनियंत्रण कक्षामार्फत सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे थेट देखरेख ठेवण्यात आली. प्रत्येक केंद्रावर बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर करून उमेदवारांची पडताळणी करण्यात आली.
उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केंद्रांना भेट देऊन आवश्यक सुविधा, सुरक्षा, बैठक व्यवस्था आणि परीक्षा साहित्य यांची तपासणी केली होती. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करून काटेकोर पालन करण्यात आले.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) शुभांगी बडे, विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव, विस्तार अधिकारी शिक्षण देवदत्त शिंदे, जिल्हा समन्वयक अनिल कुराडे या सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष देखरेख, समन्वय, नियोजन आणि अंमलबजावणी यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था
प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त, राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य, नियंत्रण कक्षातून सतत संनियंत्रण, मेटल डिटेक्टर आणि फ्रिस्किंगची काटेकोर अंमलबजावणी, आपत्कालीन सेवा आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध
“ठाणे जिल्ह्यात TET परीक्षा सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी उत्कृष्ट समन्वय ठेवला. आवश्यक सुरक्षा, आसनव्यवस्था, पर्यवेक्षण व तांत्रिक व्यवस्था काटेकोरपणे राबवण्यात आल्या. संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्तबद्धता सुनिश्चित करण्यात आली.”
— शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे
ठाणे जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, परीक्षा केंद्र प्रमुख यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे TET परीक्षा २०२५ पूर्णतः यशस्वी झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर