लातूर विकास को-ऑपरेटिव्ह ऍग्रो इंडस्ट्रीजच्या चेअरमनपदी गोविंद देशमुख यांची निवड
लातूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूर येथील विकास को-ऑपरेटिव्ह ऍग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन म्हणून गोविंद देशमुख तर व्हाइस चेअरमन म्हणून चंद्रकांत टेंकाळे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल काँग्रेेेसचे आमदार अमित देशमुख यांच्या बाभळगाव निवासस्थानी चेअरमन
व्हा. चेअरमन म्हणून श्री. चंद्रकांत टेंकाळे यांची निवड


लातूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। लातूर येथील विकास को-ऑपरेटिव्ह ऍग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन म्हणून गोविंद देशमुख तर व्हाइस चेअरमन म्हणून चंद्रकांत टेंकाळे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल काँग्रेेेसचे आमदार अमित देशमुख यांच्या बाभळगाव निवासस्थानी चेअरमन, व्हाइस चेअरमन तसेच संचालक मंडळाचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विकास को-ऑपरेटिव्ह ऍग्रो इंडस्ट्रीजचे संचालक सर्वश्री पंडित कावळे, ईश्वरप्रसाद चांडक, प्रदीप राठोड, भैरवनाथ सवासे, मंगलबाई बोराडे, महेंद्र मुळे, रमेश थोरमोठे पाटील, लताबाई मुमाने आदिजण उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande