
सोलापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळ, मुंबई व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हंगाम २०२५-२६ साठी कडधान्य खरेदीस प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत मुग, उडीद व सोयाबीन खरेदीकरीता न नोंदणी सुरू करण्यात आली असून प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया पासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मूग ८,७६८/- रूपये प्रति क्विंटल, उडीद ७८००/- रूपये प्रति क्विंटल, सोयाबीन ५३२८/- रूपये प्रति क्विंटल असे केंद्र शासनाने आधारभूत दर निश्चित केले आहेत.
राज्य शासनाने नियुक्त केलेल्या दोन केंद्रीय नोडल एजन्सींची जिल्हानिहाय खरेदी केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत.नाफेड- अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा,धाराशिव, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, परभणी, पुणे, सांगली, सातारा,वर्धा, वाशिम, संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ,भंडारा, गडचिरोली. NCCF- नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली, चंद्रपूर,नागपूर तसेच सोलापूर जिल्ह्याकरीता सोयबाीन, उडीद व मूग खरेदी केंद्रआहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड