वंदे भारत आता दौंड आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवरही थांबणार
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। वंदे भारत रेल्वे गाड्यांना प्रवाशांची पसंती मिळत असल्याने पुण्यातून धावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे- हुबळी – पुणे वंदे भारत या गाड्यांना दौंड, किर्लोस्करव
vande


पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। वंदे भारत रेल्वे गाड्यांना प्रवाशांची पसंती मिळत असल्याने पुण्यातून धावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे- हुबळी – पुणे वंदे भारत या गाड्यांना दौंड, किर्लोस्करवाडी स्थानकांवर अतिरिक्त थांबे दिले आहे. प्रायोगिक तत्वावर हा निर्णय घेतला असून, २४ नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी होईल.

गाडी क्रमांक 22225 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस दौंड येथे रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी पोहचेल. गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस दौंड स्थानकावर सकाळी ८ वाजून ८ वाजता पोहोचेल.गाडी क्रमांक 20670 पुणे – हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस किर्लोस्करवाडी स्थानकावर सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी पोहोचेल. गाडी क्रमांक 20669 हुबळी – पुणे वंदे भारत एक्स्प्रेस किर्लोस्करवाडी स्थानकावर सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांनी पोहोचेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande