चांदूर रेल्वेच्या प्रवीण पुंड यांची इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये धमाकेदार नोंद”
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.)डॉ. सी. व्ही. रमण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर रेल्वे येथे कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक श्री. प्रवीण पंजाबराव पुंड यांनी विलक्षण स्मरणशक्ती आणि आश्चर्यकारक गणिती कुवतीच्या जोरावर थेट इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ
14 मिनिटांत 100 पाढे बिनपाहता! –  चांदूर रेल्वेच्या प्रवीण पुंड यांची इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये धमाकेदार नोंद”


अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.)डॉ. सी. व्ही. रमण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर रेल्वे येथे कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक श्री. प्रवीण पंजाबराव पुंड यांनी विलक्षण स्मरणशक्ती आणि आश्चर्यकारक गणिती कुवतीच्या जोरावर थेट इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवून चांदूर रेल्वे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवाने झळकावले आहे.

प्रवीण पुंड यांनी ‘श्री क्वार्टरचा पाढा’ (3/4 चा गुणाकार) हा 1 ते 100 पर्यंत चढत्या व उतरत्या क्रमाने, तसेच प्रत्येक रांग डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे—अशा सर्व प्रकारांनी केवळ 14 मिनिटे 18 सेकंदात, तेही बिनपाहता, निर्विवादपणे म्हणून दाखवला.गणितातील मानसिक चपळाईचा हा दुर्मिळ नमुना पाहून परीक्षक थक्क झाले आणि या पराक्रमाची अधिकृत नोंद इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली.या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य, सहकारी शिल्पनिदेशक आणि संपूर्ण कर्मचारीवर्ग यांनी प्रवीण पुंड यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.गणित विषयातील त्यांची निपुणता, मानसिक वेग आणि स्मरणशक्तीवरची अविश्वसनीय पकड पाहता विद्यार्थी व युवकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे येत आहेत.प्रवीण पुंड यांचा हा विक्रम “गणितातील मानसिक वेग, स्मरणक्षमता आणि लक्ष केंद्रीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण” म्हणून नोंदला गेला असून चांदूर रेल्वे शहरासाठीही हा एक अभिमानाचा क्षण ठरला आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande