गडचिरोली - उमेदवाराला आमच्या घरात प्रवेश नाही; मतदाराने घरासमोर लावले फलक
गडचिरोली, 25 नोव्हेंबर, (हिं.स.) गडचिरोली नगरपरिषदेची 2 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. परंतु प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत मतदार गुरुदास पगाडे यांनी आपल्या घरासमोर चक्क एक फलक लावले आहे. या फलकाची सध्या जोरात चर्चा आहे. निवडणुकीत उभे असलेल
गडचिरोली - उमेदवाराला आमच्या घरात प्रवेश नाही; मतदाराने घरासमोर लावले फलक


गडचिरोली, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)

गडचिरोली नगरपरिषदेची 2 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. परंतु प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत मतदार गुरुदास पगाडे यांनी आपल्या घरासमोर चक्क एक फलक लावले आहे.

या फलकाची सध्या जोरात चर्चा आहे. निवडणुकीत उभे असलेल्या कोणत्याच उमेदवाराला आमच्या घरात प्रवेश नाही, कृपया मत मागायला येऊ नका

असे या फलकात नमूद करण्यात आले आहे.

निवडून आल्यानंतर कुठलाही नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आमच्या वॉर्ड मध्ये येऊन पहात सुद्धा नाही. मागील कित्येक महिन्यांपासून नाल्यांची सफाई झालेली नाही, पथदिवे नाहीत. पाणीपुरवठयाची समस्या आहे. अशा बहुतांश समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कुठल्याही उमेदवाराने आमच्या घरी मत मागायला येऊ नये अशी संतापाची भावना गुरुदास पगाडे यांनी व्यक्त केली आहे.

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande