
परभणी, 25 नोव्हेंबर, (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, परभणी कार्यालयामार्फत भारतीय संविधानास 75 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमाअंतर्गत दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी श्री.शिवाजी महाविद्यालय, परभणी सांस्कृतिक सभागृह क्र. 2 येथे सकाळी ठिक 11.00 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमामध्ये भारतीय संविधान व सामाजिक परिस्थीती या विषयावर उपप्राचार्य, (श्री. शिवाजी महाविद्यालय) प्रा. एन.एन. राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेल आहे.
तरी या कार्यक्रमास नागरीकांनी व विदयार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजु एडके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis