रत्नागिरी : कसबा हायस्कूलच्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : कसबा हायस्कूलच्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनमार्फत सन २०२५-२६ या वर्षातील कुमार मुले जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा ओणी हायस्कूलमध्ये
रत्नागिरी : कसबा हायस्कूलच्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड


रत्नागिरी, 24 नोव्हेंबर, (हिं. स.) : कसबा हायस्कूलच्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनमार्फत सन २०२५-२६ या वर्षातील कुमार मुले जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा ओणी हायस्कूलमध्ये झाली. १८ वर्षांखालील वयोगटातील खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील १८ वर्षे वयोगट विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. संघाने अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन करत अटीतटीच्या सामन्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावले. 🏻स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थी असे - आशीष अनंत बालदे, आर्यन अनंत बालदे, अथर्व श्रीराम गराटे आणि पार्थ मनोज बुदर. यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

एकावन्नाव्या स्पर्धा बुऱ्हाणनगर (अहिल्यानगर) येथे राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व हे चार विद्यार्थी करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande