
अकोला, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता अधिक वेग आला असून त्यात मोठ्या नेत्यांच्या सभा रंगत आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा 25 नोव्हेंबर रोजी सकाळी11 वाजता अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे आयोजित करण्यात आली आहे.
हिवरखेड, अकोट आणि तेल्हारा या तिन्ही नगरपरिषदांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे. भौगोलिकदृष्ट्या हिवरखेड हे अकोट आणि तेल्हारा नगरपरिषदांच्या मधोमध असल्याने ही सभा हिवरखेड येथे ठेवण्यात आली आहे.हिवरखेड नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सुलभा दुतोंडे, तेल्हारा नगरपरिषद येथील वैशाली पालीवाल, तर अकोट नगरपरिषदेतील माया धुळे यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवारांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्याच्या उद्देशाने भाजपकडून ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या तयारीला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार वेग दिला असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाल्याने आणि मोठ्या नेत्यांची सभा होत असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे तिन्ही नगरपरिषदांमध्ये विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे