ताडोबात आलेल्या सचिनला पुन्हा व्याघ्रदर्शन
चंद्रपूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आठव्यांदा ताडोबात आल्यानंतर सचिनला पुन्हा एकदा व्याघ्रदर्शन झाले आहे. बहुतांश ताडोबा ''ट्रीप''ला त्याला व्याघ्रदर्शन झाले आहे. ते बघून तो ''वाह ताडोबा.. ''म्हणाला आहे. मास्टर ब्ला
ताडोबात आलेल्या सचिनला पुन्हा व्याघ्रदर्शन


चंद्रपूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आठव्यांदा ताडोबात आल्यानंतर सचिनला पुन्हा एकदा व्याघ्रदर्शन झाले आहे. बहुतांश ताडोबा 'ट्रीप'ला त्याला व्याघ्रदर्शन झाले आहे. ते बघून तो 'वाह ताडोबा.. 'म्हणाला आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा पत्नी डॉ. अंजली व काही मित्रांसोबत गुरूवारी नागपूरमार्गे ताडोबात पर्यटन सफारीकरिता दाखल झाला. ताडोबात दाखल झाल्यानंतर तो खाजगी रिसोर्ट मध्ये थांबला. शुक्रवारी पत्नी तसेच मित्र परिवारासोबत कोलारा गेट येथून सकाळी बफर क्षेत्रात आणि दुपारच्या प्रहरी कोअर क्षेत्रात सफारी केली. मात्र या दोन्हीही फेरीत त्याला व्याघ्र दर्शन झालेले नाही. शनिवारी पहिल्या फेरीत त्याला पाणवठ्यावर युवराज दिसला. दुपारचे फेरीत सचिनने पुन्हा कोलारा गेट'ची वाट धरली. यावेळी त्याला युवराजची पुन्हा दर्शन झाले. याचवेळी दुरून बिजली वाघिणीच्या कुटुंबाचे देखील त्यांना दर्शन झाल्याची माहिती आहे.सचिन यापूर्वी सात वेळा ताडोबात येथे येऊन गेला होता. सचिन तेंडुलकर दरवर्षी ताडोबाला भेट देत असून, येथील वाघांविषयी त्यांना विशेष आकर्षण आहे. ताडोबावर त्याचे विशेष प्रेम असून वेळोवेळी त्यांनी त्याबद्दल बोलून देखील दाखविले आहे. ताडोबातील सचिनचा वार्षिक दौरा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. गेल्या वर्षी त्यांनी ताडोबातील एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता आणि भेटवस्तूही दिल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande