
छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक २५ नोव्हेंबर, दुपारी ३ वाजता जाहीर सभा होणार आहे.
श्री भद्रा मारोती मंदिर परिसर, रत्नपुर (खुलताबाद), छत्रपती संभाजीनगर येथे यास जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे
ही सभा मतदारसंघाच्या विकासगतीला नवसंजीवनी देणारी ठरेल. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या विकासयात्रेला अधिक मजबूत आधार मिळेल.
असे सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis