कंधारच्या विकासाला गती देणं आवश्यक - अजित पवार
नांदेड, 24 नोव्हेंबर (हिं.स.) कंधारच्या विकासासाठी जेवढी मदत करता येईल ती आम्ही करू. विकासाला गती देणं आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यात कंधार येथे सांगितले. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची जाहीर सभा आयोजित
कंधारच्या विकासासाठी जेवढी मदत करता येईल ती आम्ही करू. विकासाला गती देणं आवश्यक आहे.


नांदेड, 24 नोव्हेंबर (हिं.स.) कंधारच्या विकासासाठी जेवढी मदत करता येईल ती आम्ही करू. विकासाला गती देणं आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यात कंधार येथे सांगितले. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की,कंधार ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी आहे. या शहराला स्वातंत्र्य लढ्याचा वेगळा वारसा आणि इतिहास लाभलेला आहे. १९६३ साली स्थापन झालेली कंधार नगरपालिका आजही त्या वारशाचा अभिमान बाळगते. कंधार आणि लोहा ह्या दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा, त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं. जनकल्याणाच्या कार्यात आमचे उमेदवार कुठेही कमी पडणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कंधार नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार स्वप्नील (हनुमंत) विश्वनाथ लुंगारे, लोहा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित करताना आज भावना व्यक्त केल्या.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनं राष्टवादी काँग्रेस पक्ष पुढे चालत राहिला आहे. कंधार शहरात एक तरुण, शिक्षित आणि विकासाभिमुख उमेदवार हा नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उभा केला आहे, तर लोहा येथे शेतकरी कुटुंबातील आमचा सहकारी, उमेदवार म्हणून उभा आहे. ही निवडणूक कंधार आणि लोहाच्या विकासाची निवडणूक आहे. पुढील विकासाला दिशा देणारी निवडणूक आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि शहरी क्षेत्रातील विकासाला चालना देणारी ही निवडणूक आहे.

कंधारच्या विकासासाठी जेवढी मदत करता येईल ती आम्ही करू. विकासाला गती देणं आवश्यक आहे. आम्ही पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत उत्तम पद्धतीनं विकासकामं मार्गी लावली आहेत. सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आहे. अत्याधुनिक व्यापारपेठ, वाढत्या शहरासाठी मजबूत मूलभूत सुविधा हे सगळं उभारायचं आहे, असं सभेच्या निमित्तानं स्पष्ट केलं.

चालू असलेली विकासकामं पूर्णत्वास न्यायची आहेत. आम्ही काम करणारी माणसं आहोत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. तुम्ही साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ. काही नवे आणि काही अनुभवी उमेदवार दिले आहेत. नव्या-जुन्याचा समन्वय साधून कंधार आणि लोहाचा विकास साधायचा आहे. दोन्ही शहरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही टीम उभी केली आहे. घड्याळावरील बटण दाबा आणि आमचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन केलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande