नूतन विद्यालयाच्या २१०० विद्यार्थ्यांकडून २० हजार चौ.फुटांची ‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळी!
परभणी, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। नूतन विद्यालय, सेलू येथे स्वीप मतदार जागृती अभियानांतर्गत एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. नूतन विद्यालयातील तब्बल २१०० विद्यार्थ्यांनी वीस हजार स्क्वेअर फुट व्यापणारी ‘वोट फॉर सेलू’ अशी भव्य मानवी साखळी उभ
नूतन विद्यालयाच्या २१०० विद्यार्थ्यांकडून २० हजार चौ.फुटांची ‘वोट फॉर सेलू’ मानवी साखळी!


परभणी, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

नूतन विद्यालय, सेलू येथे स्वीप मतदार जागृती अभियानांतर्गत एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. नूतन विद्यालयातील तब्बल २१०० विद्यार्थ्यांनी वीस हजार स्क्वेअर फुट व्यापणारी ‘वोट फॉर सेलू’ अशी भव्य मानवी साखळी उभी करून लोकशाही बळकटीकरणाचा सामुदायिक संदेश दिला.

सेलू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाचे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह चव्हाण, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, नगरपरिषद मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम मगर आदी मान्यवरांनी केले.

या सर्जनशील उपक्रमाची संकल्पना नूतन विद्यालयाच्या चित्रकला विभाग प्रमुख किशोर कटारे आणि क्रीडा शिक्षक प्रशांत नाईक यांची होती. नूतनच्या मैदानावर २१०० विद्यार्थी कलात्मक पद्धतीने मांडून वोट फॉर सेलू हा प्रभावी संदेश साकारण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, शंकर बोधनापोड, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, मुख्याध्यापक उल्हास पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी तुकाराम मगर यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगत लोकशाही प्रक्रियेतील सक्रीय सहभागाचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ किर्ती राऊत यांनी देऊन उपक्रमात उत्साह निर्माण केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू बुधवंत यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेश हिवाळे यांनी केले.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी फुलसिंग गावित, सच्चिदानंद डाखोरे, संजय भुमकर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande