
बीड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
गेवराई नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने आयोजित केलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांच्या उपस्थितीत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित अल्पसंख्याक मेळाव्यात आमदार मलिक उपस्थित होत्या
या कार्यक्रमाला गेवराई विधानसभा क्षेत्राचे आमदारमा. श्री. विजयसिंह पंडित जी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित , पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार तसेच कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis