कुणावर टीका करण्यासाठी नाही तर विकासाचे व्हिजन घेऊन आलोय - फडणवीस
त्र्यंबकेश्वर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आणि नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर येथे सभा पार पडली. यावेळी त्यां
कुणावर टीका करण्यासाठी नाही तर विकासाचे व्हिजन घेऊन  आलो आहे -   फडणवीस


त्र्यंबकेश्वर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आणि नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी आपण येथे कुणावर टीका करण्यासाठी आलो नाही तर त्र्यंबकचे पुढील पाच वर्षांचे व्हिजन घेऊन आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले, “आपल्याला कल्पना आहे की आई गोदावरी ही आमच्या संस्कृतीची वाहक आहे. गंगेच्या आणि गोदावरीच्या तीरावर आमची सनातन संस्कृती उभी राहिली असून, आज जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून या सनातन संस्कृतीकडे बघितले जाते. सनातन संस्कृतीमध्ये त्र्यंबकच्या ज्योतिर्लिंगांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशामध्ये महाराष्ट्र एकमेव असे राज्य की ज्या ठिकाणी पाच ज्योतिर्लिंग असून, त्र्यंबकेश्वरांसारखे एक आद्य ज्योतिर्लिंग ज्या ठीकाणाहून आई गोदावारीने प्रकट होऊन आपल्याला आशीर्वाद दिला आहे. खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम भूमी करण्याकरिता आई गोदावरीने ज्या ठिकाणी अवतरण केले अशा प्रकारची ही पुण्यभूमी आहे. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली हनुमंतांच्या विचाराने पावन झालेली आई सीतामाई आणि प्रभू लक्ष्मणाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज आपल्यामध्ये येत आले याचा मला अतिशय आनंद होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले, त्र्यंबकमध्ये आपण नगराध्यक्षपदासाठी कैलास घुले यांच्यासारखा एक उच्चशिक्षित उमेदवार दिला त्याचा मला आनंद आहे. ते एक अनुभवी असून, व्यवसायाने इंजिनियर आहेत. यापूर्वीचे अनेक कुंभमेळे त्यांनी बघितले असून,मंदिरच्या ट्रस्टवर सदस्य देखील आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक कामाचे व्हिजन आहे. मी कोणावर टीका करण्याकरता आलेलो नसून, कुंभाच्या निमित्ताने संपूर्ण जगातील लोक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणार आहेत. याठिकाणी सनातनाला मानणारे करोडो लोक येणार आहेत. त्यामुळे आपली नगरी सुरक्षित ठेवण्यासाठी भविष्यात त्र्यंबक नगरीत आल्यानंतर एक पावित्र्य वाटलं पाहिजे. येथील नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा निचरा, सांडपाण्याची व्यवस्था, शिक्षण व आरोग्याचे प्रश्न निकाली काढून इथल्या सामान्य माणसाचे जीवनमान वाढविण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नातील त्र्यंबकेश्वर तयार करण्यासाठी मतांच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद द्या, असे फडणवीस यांनी म्हटले.

आमचे विरोधक नकारात्मक प्रचार करत सांगतात की कुंभाच्या नावावर तुमचे घर तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, मला स्पष्टपणे सांगायचं आहे की, या ठिकाणी कोणालाही विस्थापित करण्यासाठी आलो नाही.सगळ्यांना सोबत घेऊनच या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. आपण कुंभाच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याची योजना घेतली आहे. मात्र, बाराही महिने त्र्यंबकेश्वरच्या लोकांना २४ तास पाणी मिळेल एवढं पाणी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे. कुशावर्त कुंडातील पाणी स्वच्छ असलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. येथील रस्ते चांगले असले पाहिजे. त्याच्यावर खड्डे पडू नये अशा प्रकारचे रस्ते झाले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. आपल्याकडे नगरपरिषद कशी चालवायची याचा अनुभव असणारे नेतृत्व आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य घडविण्यासाठी आणि त्र्यंबकला सुंदर शहर करण्यासाठी त्यांना एक संधी द्या, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande