
नाशिकचा जळ्गांव होऊ देणार नाही
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
नाशिक, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये साधू-महंतांना सुविधा देण्यासाठी महापालिका प्रशासन 54 एकरवरील 1825 वृक्ष तोडण्याच्या तयारी आहे. या निर्णयाला सुरवातीपासून पर्यावरणप्रेमीकडून कमालीचा विरोध होत आहे. याप्रकरणी मनपाकडे दाखल हरकतीवर सोमवारी (दि.24) सुनावणी घेण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमीनी आक्रमक होत साधुग्राममधील एकही झाड तोडू देणार नाही आणि नाशिकचा जळ्गांव होऊ देणार नाही. असा इशारा पर्यावरणप्रेमींनी सिंहस्थमंत्री गिरीश महाजनांना दिला. तसेच महापालिकेच्या निर्णयाविरोधात थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे पर्यावरणप्रेमींनी आपली भूमिका मांडली.
साधुग्राममधील प्रस्तावित वृक्षतोडीसंदर्भात पंचवटीतील पलुस्कर सभागृहात सोमवारी उद्यान अधिक्षक विवेक भदाणे, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरीशचंद्र, उपअभियंता समीर रकटे, नितीन राजपूत यांच्या प्रमुख उपस्थित सुनावणी झाली. महापालिकेकडून सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. अंदाज वर्तवल्याप्रमाणेच तीव्र विरोधामुळे ही सुनावणी चांगलीच वादळी ठरली. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पलुस्कर सभाग्रहात व बाहेर पोलिसांसह सुरक्ष रक्षकांचा चोख बंदोब्स्थ ठेवण्यात आला होता. यावेळी उपस्थित पर्यावरणप्रेमी प्रारंभीपासून आकमक झालेले दिसले. साधुग्राममधील वृक्षतोड भूमाफीयांसाठी व बांधकाम व्यावसायिकांसाठी सुरु असल्याचे गंभीर आरोप केले गेले. साधु-महंतांसाठी जी झाडे तोडली जाणार आहे. त्यासाठी त्यांची तरी इच्छा आहे का ? आजवर एवढे सिंहस्थ झाले. त्यावेळी कधीही झाडे तोडली नाहीत. मग आताच कशासाठी अठारशे खुन करण्याचे पातक करण्याचा प्रयत्न होतो आहे. एखाद्या सामान्य माणसाने झाड तोडले तर त्यांच्यावन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो येथे तर तुम्ही अठराशे खून करताय. तपोवनमधील एकही झाड तोडता कामा नये. साधुग्रामचा अटटाहास कशासाठी केला जतोय. तेतील झाडांमुळे जैवविविधता जोपासली जात आहे. महापालिकेने हुकुमशाही पद्द्धतीने झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तो कधीही आम्ही यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला. वृक्षतोड करणे कायद्याने गुन्हा असून महापालिका मनमानीप्रमाणे वागू शकत नाही. असे म्हणत उपस्थित पर्यावरणप्रेमींनी एकमुखीने सोमवारच्या सुनावणीत प्रस्तावित वृक्षतोडीला कडाडून विरोध केला. सुनावणीवेळी माजी नगरसेवक राजेद्र बागुल, राजू देसले, निरंजन टकले, संदीप भानोसे, देवांग जानी, निशीकांत पगारे, रोहन देशपांडे आदीसह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
सुनावणी सोडून आयुक्त बक्षीस समारंभाला
वृक्षतोडप्रकरणी महत्वाची सुनावणी असताना आयुक्त मनीषा खत्री यांनी पाठ फिरवली. मात्र दुसरीकडे त्या एखा बक्षीस समारंभाला गेल्याचे त्यांनी त्याचे इन्स्टाग्रामवर टाकल्याचे उपस्थितांमधून एकाने सांगत यांना वृक्षबाबत काहीच महत्व नसल्याचे म्हटले.
तर सुनावणी रद्द करु ; उद्यान अधिक्षक भदाणे
सुनावणी सुरु होताच उद्यान अधिक्षक उपस्थितांसमोर बोलू लागाताच त्यावर माजी नगरसेवक राजेद्र बागुल यांनी सुनावणीसाठी सक्षम अधिकारी येथे कोणीही नाही. जे आहेत ते प्रभारी असून आयुक्तांनी स्वत: येथे हव्या होत्या. यावरुन पर्यावरणप्रेमींकडून गोंधळ घातला जाऊ लागला, शांत होण्याचे आवाहन करुनही प्रतिसाद दिला जात नसल्याचे पाहून उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांनी जर असाच गोंधळ सुरु राहिल्यास सुनावणी रद्द केल्याचे जाहीर करु असे म्हणताच पर्यावरणप्रेमी नरमले.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV