
नांदेड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे,यांनी आयोजित केलेल्या आरक्षण वर्गीकरण महापदयात्रा,आज नांदेड शहरात दाखल झाली.
यावेळी शिवसेनेचे नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे, यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या पदयात्रेस शुभेच्छा देऊन त्यांच्यासोबत काही अंतर पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी समाज बांधवांशी संवाद साधला.
प्रदेश अध्यक्ष कैलास खंदारे ,प्रदेश कार्याध्यक्ष नारायण गायकवाड, जिल्हाध्यक्ष प्रितम गवाले बावलगावकर , नागोराव आंबटवार शहर अध्यक्ष भारत सरोदे , सामाजिक नेते गणेश तादलापुरकर, ईश्वर अण्णा जाधव रवी पवळे, नामदेव कांबळे, संतोष सुर्यवंशी ... तसेच सोशल मीडिया व संपर्क प्रमुख नितीन वायदंडे, अनिकेत हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis