
नाशिक, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। सरकारी मलिदा खाण्यात मग्न असलेल्या प्रशासनाला नैसर्गिक फळाफुलांची गरज नाही. सिंहस्थ च्या नावाखाली फार मोठा भ्रष्टाचार नाशिक शहरात सुरू असून याचे उदाहरण म्हणजे ठेकेदाराला पैसे मिळावे म्हणून हजारो झाडाची कत्तल करून नाशिकवासी यांचा एक प्रकारे अपमान केला जात आहे असे स्पष्ट उद्गार नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी काढले.
त्यांनी बोलताना सांगितले की महानगरपालिका प्रशासनाला व शहरातील लोकप्रतिनिधींना नाशकातील नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचा कुठलाही अधिकार नाही ही हजारो झाड श्रीराम भूमीचे आहेत. नागरिकांच्या भावनांशी खेळ थांबवावा व झाडांची कत्तल थांबवावी अन्यथा आगामी काळात सत्ताधारी लोकप्रतिनिधींना जनता स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दाखवून देईल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन सत्ताधारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा बुरखा फाडला पाहिजे महाराष्ट्रात महिला संरक्षण महिलांवर होणारे अत्याचार तसेच प्रशासनाचा भ्रष्टाचार हे सगळे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जावं असे आवाहन याप्रसंगी आकाश छाजेड यांनी केले.प्रभाग क्रमांक 21 व 22 येथील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आकाश छाजेड बोलत होते. उमेदवारी देत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही व तरुणांना संधी देण्यात येईल असेही छाजेड यांनी सांगितले.नाशिक रोड येथे प्रभाग क्रमांक 21 व 22 येथील काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीचे आयोजन पूर्व विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जावेद पठाण, व नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे सचिव शाहिद बाबा शेख यांनी केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV