उदगीर - जळकोटचा विकास हीच खरी जबाबदारी - आ. संजय बनसोडे
लातूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। मागील सहा वर्षांप्रमाणेच पुढील काळातही प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी, सर्वसमावेशक विकासासाठी आणि जनतेच्या समस्यांवर तातडीने उपाय करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहीन. असे उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोड
आमदार


लातूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। मागील सहा वर्षांप्रमाणेच पुढील काळातही प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी, सर्वसमावेशक विकासासाठी आणि जनतेच्या समस्यांवर तातडीने उपाय करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहीन. असे उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले दाखविलेला विश्वास ही सर्वात मोठी शक्ती असून, उदगीर - जळकोटचा विकास हीच खरी जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.

आमदार बनसोडे पुढे म्हणाले की, मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात प विकासधारित दृष्टीकोन ठेवून केलेल्या कामांच्या बळावर उदगीर–जळकोट मतदारसंघातील जनतेने मला पुन्हा एकदा विश्वासाने सलग दुसऱ्यांदा विजयी करून विधानसभेत पाठवले. एक वर्ष पूर्ण होत असल्याने उदगीर आणि जळकोट तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपुलकीपूर्वक एकत्र येत केक कापून सत्कार केला आणि आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या डोळ्यांतील आनंद, चेहऱ्यावरील समाधान आणि पक्षावर असलेल्या दृढ विश्वासाने हा क्षण अविस्मरणीय ठरला.कार्यकर्त्यांनी केलेला हा सन्मान पुन्हा एकदा नव्याने ऊर्जित करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि जनतेच्या आशीर्वादाने विकासाची ही वाटचाल आणखी वेगाने पुढे नेण्याचा दृढ संकल्प आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande