
पुणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा-२०२६’च्या अनुषंगाने सिंहगड घाट परिसरात सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे २६ नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच पोलिस अधीक्षक (पुणे ग्रामीण) यांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला.स्पर्धकांची सुरक्षितता आणि रस्त्यावरील काम सुरळीत पार पाडावे, यासाठी गोळेवाडी चौक ते सिंहगड घाट (कोंढणपूर बाजू) हा मार्ग पूर्णपणे बंद केला जाणार आहे. या काळात सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची आणि स्थानिकांची वाहतूकही खोळंबणार आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु