सोलापूर विद्यापीठाच्या ८१ कोटींच्या इमारती ‘वन’ जागेत!
सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची हिरज रोडवर ४८२ एकर जमीन आहे. विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज एकाच छताखाली असावे म्हणून त्या क्षेत्रात ५२ कोटींची भव्य प्रशासकीय इमारत बांधली. त्याच ठिकाणी १४ कोटींचा म
Univerisity Solapur


सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची हिरज रोडवर ४८२ एकर जमीन आहे. विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज एकाच छताखाली असावे म्हणून त्या क्षेत्रात ५२ कोटींची भव्य प्रशासकीय इमारत बांधली. त्याच ठिकाणी १४ कोटींचा मल्टिपर्पज हॉल व १४ कोटी ८२ लाखांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारकही बांधले जात आहे. तिन्ही कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियोजित आहे. मात्र, तिन्ही इमारती ‘वन’ आरक्षित जागेत येत असल्याने लोकार्पणाचा तिढा निर्माण झाला आहे.ऑक्टोबर २०२० मध्ये ४८२ एकर परिसरातील मल्टिपर्पज हॉलसाठी परवानगी मिळाली. २०२३ मध्ये प्रशासकीय इमारतीसाठी ५४.१९ कोटींचा निधी मंजूर झाला. या इमारती वन विभागाच्या जागेत उभारल्या जात असताना देखील राज्य शासनाने निधी दिला. आता पंतप्रधान लोकापर्णासाठी येणार असल्याने ती बांधकामे नियमित करण्यासाठी विद्यापीठाचा खटाटोप सुरू झाला आहे.नव्या प्रशासकीय इमारतीकडे विद्यार्थ्यांना ये-जा करता यावे म्हणून सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडी येथून मोठा रस्ता केला जाणार आहे. पण, त्यातही वन विभागाची जागा असल्याने तो रस्ताही अडकणार आहे. ४८२ एकरातील या ६५ एकरात माळढोक, वन्यजीव व इको सेन्सेटिव्ह झोन असल्याने बांधकाम केलेल्या ८१ कोटींच्या इमारतींचा वापर वन विभागाच्या परवानगीशिवाय करता येईल का, हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande