
छत्रपती संभाजीनगर, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।फुलंब्री तालुक्यातील विविध विकास कामांना गती देण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली आहे
राज्यपाल श्री.हरिभाऊ नाना बागडे यांच्या विशेष प्रयत्नांतून मौजे लामकाना येथे (१५ लक्ष) निधीतून सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन भाजपाच्या फुलंब्री विधानसभा मतदार सघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलेतसेच खासदार रावसाहेब दानवे यांच्या स्थानिक विकास निधीतून मौजे लामकाना येथे सिमेंट रस्ता बांधकामाचा (१० लक्ष) भूमिपूजन सोहळा संपन्न झाला..यावेळी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis