अमरावती : फलक लावण्यापूर्वी इमारतीवरील कर भरण्याची सक्ती; उमेदवारांसमोर नवा पेच
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)| उमेदवारांना आपला प्रचार करण्यासाठी ज्या इमारतींवर फलक लावायचा आहे. त्या इमारतीवर नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसावी, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांसमोर नवा पेच उभा राहिला आहे. ज्या इमारतीचा मालमत्ता कर भरल
फलक लावण्यापूर्वी इमारतीवरील कर भरा कर भरण्यासाठी सक्ती; उमेदवारांसमोर नवा पेच


अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)| उमेदवारांना आपला प्रचार करण्यासाठी ज्या इमारतींवर फलक लावायचा आहे. त्या इमारतीवर नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसावी, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांसमोर नवा पेच उभा राहिला आहे. ज्या इमारतीचा मालमत्ता कर भरलेला नाही, त्या इमारतीचा आता ऐनवेळी कर भरावा लागणार आहे. त्यानंतरच इमारतीवर फलक लावता येणार आहे.

या नव्या अडचणीबाबत अनेक उमेदवारांनी प्रशासनाकडे तक्रार करून यातून मार्ग काढण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील अशाप्रकारच्या जाचक अटींवर काही उमेदवारांनी तर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी फलक, झेंडे किंवा कॉर्नर सभा घेण्यासाठी मिळणाऱ्या परवानगी पत्रामध्ये घरमालकाची संमती तसेच त्या घराचा मालमत्ता कर (टॅक्स) भरल्याची पावती अनिवार्य करण्यात आली आहे.

त्यामुळे झेंडा लावण्यासाठी सुद्धा घरटॅक्स भरलेला आवश्यक असणे, हा नियम गोरगरिब उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच पार पडणार याबाबत विचारणा केली असता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोहकरे यांनी सांगितले की, निवडणूक परवानगी पत्राचा नमुना आणि सर्व कामकाज हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसारच केले जात आहे. निवडणूक पूर्णपणे नियमांनुसारच होत आहे.

आहे, असे काही उमेदवारांचे म्हणणे निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक संहितेनुसार कॉर्नर सभा ज्या घराजवळ होणार आहे, त्या घराचा टॅक्सही भरलेला असणे बंधनकारक केल्याचे परवानगी अर्जात नमूद आहे. त्यामुळे शहरात सभा कशी घ्यायची, असा सवाल आहे. आमच्यासाठी कर भरावा, असे कोणताही उमेदवार त्यांना म्हणू शकणार नाही. मग दुसरा पर्याय म्हणून प्रत्येक ठिकाणी फलक किंवा सभा आयोजित करण्यासाठी संबंधित घरमालकांचा टॅक्स उमेदवारांना भरावा लागणार का, असा प्रतिप्रश्न उपस्थित झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande