मतदार यादीतील घोळामुळे अमरावतीत राजकीय खळबळ
- मतदार यादी तपासा, आक्षेप घेवून दुरूस्ती करा मनपा आयुक्तांचे आवाहन अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। सध्या जिल्ह्यात १० नगर परीषद आणि २ नगर पंचायत निवडणूक रणधुमाळीने वातावरण तापले आहे. त्यात आणखी भर म्हणजे मनपाने जाहिर केलेल्या प्रारुप मतदार यादीत
मतदार यादीचा गोंधळ शिगेला : २४ हजार नावे डबल, हजारो गायब भाजप- काँग्रेस सह अनेक राजकीय पक्षांचे आक्षेप


- मतदार यादी तपासा, आक्षेप घेवून दुरूस्ती करा मनपा आयुक्तांचे आवाहन

अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। सध्या जिल्ह्यात १० नगर परीषद आणि २ नगर पंचायत निवडणूक रणधुमाळीने वातावरण तापले आहे. त्यात आणखी भर म्हणजे मनपाने जाहिर केलेल्या प्रारुप मतदार यादीत घोळच घोळ समोर आल्याने शहरातील राजकीय पक्षासह पदाधिकारी आक्रमक झाले आहे.

याबाबत भाजपचे खा. डॉ. अनिल बोंडे आणि भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांसोबत चर्चा करून एकही मतदार मतदानापासून वंचीत राहणार नाही अशी सूचना केली. तर दुसरीकडे प्रभाग १० बेनोडा-भीमटेकडी मधील सुमारे ८५०० मतदारांची नावे ही प्रभाग क्र मांक ८- जोग स्टेडीयम चपराशी पुरा या प्रभागात गेल्याचे माजी उपमहापौर संध्या टिकले यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी सुद्धा मनपाने प्रकाशित केलेल्या प्रारुप मतदार यादीत झालेले घोळ, त्रुटीची दखल घेत नागरिकांना आपले आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले.

एवढेच नाही तर सर्वच २२ ही प्रभागात किमान २२ ते २४ हजार मतदारांची नावे दोन-दोन प्रभागात असल्याची धक्कादायक माहिती आहे. दरम्यान, येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांनी मतदार यादी पाहून आपले आक्षेप नोंदवून दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी केले आहे. दरम्यान, प्रारुप मतदार यादीवर मंगळवार २४ नोव्हेंबरपर्यंत १४८ आक्षेप दाखल झाले होते.

मतदार यादी तपासा, आक्षेप घेवून दुरूस्ती करा मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांचे आवाहन

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ र करीता ०१ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात ब असलेली विधानसभेची मतदार यादी महानगरपालिका निवडणूकीकरीता प्रभाग क्रमांक १ ते २२ मध्ये विभाजन करुन प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी महानगर पालिकेतील amravaticorporation.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

ही प्रारूप मतदार यादी नागरिकांच्या पाहणीकरीता मुख्य कार्यालय, महानगरपालिका, अमरावती येथे ठेवण्यात आली आहे. तसेच प्रभाग निहाय प्रारुप मतदार राझोन क्रमांक १ - रामपुरी कॅम्प, झोनक्र.२-- रानपेठ, झोन क्र. ३- दस्तुर नगर, झोन क्र. ४-- बहनेरा, झोन क्र. ५ - भाजीबाजार येथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. आपल्या प्रभागातील मतदार यादीत मतदारांचे नाव नसल्यास किवा काही अडचन असल्यास २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजे पर्यंत निवडणूक विभाग, महानगरपालिका अमरावती येथे संपर्क साधुन हरकत नोदवावी. तेणेकरुनकोणताही मतदार मतदानापासुन वंचित राहणार नाही, असे आवाहन मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande