लातूर - अहमदपूर तालुक्यात वडील आणि मुलाची धारधार शस्त्राने हत्या
लातूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यातील रुद्धा येथील शेत शिवारात वडील आणि एकुलत्या मुलाचा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचे
अहमदपूरमधील दुहेरी हत्याकांडाने लातूर हादरले


लातूर, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।

अहमदपूर तालुक्यातील रुद्धा येथील शेत शिवारात वडील आणि एकुलत्या मुलाचा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

तालुक्यातील रुद्धा येथील शिवराज निवृत्ती सुरनर वय ७० वर्षे आणि त्यांचा एकुलता एक मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर वय २० वर्षे या दोघांचा त्यांच्याच शेतातील आखाड्यावर झोपले होतेकोणीतरी अज्ञात इसमांनी धारदार कोयत्यांनी वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली असून खुनाचे कारण अद्यापही समजले नाही.

सदर घटना पोलीसांना समजल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त एस.पी. चव्हाण, डीवायएपी अरविंद रायबोले, पी.आय. विनोद मेत्रेवार आणि पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande