मालेगावमध्ये सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्ट्या सह इतर हत्यार जप्त
मालेगाव, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। मागील भांडणाची कुरापत काढून मालेगाव येथील सराईत गुन्हेगार मेहताब अली शौकत अली याने दहा ते बारा सहकाऱ्यांसह एकाच्या घरात घुसून तलवारीसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच घरातील साहित्य व मोटारसायकलींची मोडतोड केली. य
मालेगावमध्ये सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्ट्या सह इतर हत्यार जप्त


मालेगाव, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। मागील भांडणाची कुरापत काढून मालेगाव येथील सराईत गुन्हेगार मेहताब अली शौकत अली याने दहा ते बारा सहकाऱ्यांसह एकाच्या घरात घुसून तलवारीसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच घरातील साहित्य व मोटारसायकलींची मोडतोड केली. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मेहताब अली शौकत अली (रा.नया इस्लामपुरा,मालेगाव) यास घटनेनंतर अवघ्या दोन तासात अटक केली आहे. त्याच्याकडून दोन देशी पिस्तुलासह आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मेहताब अली शौकत अली व फिर्यादी हे एकाच गल्लीत राहणारे असून, फिर्यादीबरोबर भांडणाची कुरापत काढून त्याच्या घरात घुसून मेहताब अली व त्याच्या सहकाऱ्यांनी घरातील सामानाची व मोटारसायकलची मोडतोड केली व घरातील व्यक्तींना मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचा मोबाईल व ५० हजार रुपये गहाळ झाले होते. या प्रकरणी मालेगाव येथील आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, मालेगावचे अप्पर पोलीस अधिक्षक तेगबिरसिंह संधू, सहाय्यक पोलीस अधिक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. या पथकाने आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच घटनेनंतर अवघ्या दोन तासात त्यास अटक केली.

आरोपी मेहताब अली शौकत अली हा मालेगाव येथील सराईत गुंड असून, त्याच्याविरूद्ध यापूर्वी मालेगाव येथील आयेशानगर, आझादनगर, छावणी पोलिस ठाण्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आदी प्रकारचे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

आरोपीच्या शोधासाठी मालेगाव अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने पो.उ.नि. पाराजी वाघमोडे, अंमलदार सचिन बेदाडे, दिनेश शेरवते, राकेश जाधव, अक्षय चौधरी, राम निसळ, राकेश उबाळे, नीलेश निकम, तांत्रिक विभागाचे हवालदार हेमंत जेजुरे, प्रदीप बहिरम आदींच्य पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास करून आरोपीस अटक केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande