भरधाव आयशर टेम्पोची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू
लातूर, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)। भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीस जोरदार धडक दिल्यामुळे निलंगा तालुक्यातील पान चिंचोली येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.पानचिंचोली येथील अतुल भरत दिवे वय २८ वर्षे असे या युवकाचे नाव आहे कांहीं आठवड्या पूर्वीच त्याच
भरधाव आयशर टेम्पोची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू


लातूर, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)।

भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीस

जोरदार धडक दिल्यामुळे निलंगा तालुक्यातील पान चिंचोली येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.पानचिंचोली येथील अतुल भरत दिवे वय २८ वर्षे असे या युवकाचे नाव आहे

कांहीं आठवड्या पूर्वीच त्याच्या मोठ्या भावाचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. लागोपाट दोन तरुण मुले गेल्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या बद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

निलंगा तालुक्यातील अतुल भरत दिवे हा पानचिंचोली येथून थेरगावला दुचाकी क्रमांक एम एच २४ एस ६३७० या पॅशन प्रो गाडीवरून थेरगावला जात होता.

कवठा पाठी गौर शिवारात निटूरकडून लातूरकडे येणा-या एम एच २४ ए यू ३१९८ या आयशर टेम्पोने भरधाव वेगात जोराची धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले.

त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. सदरील लातूर-जहीराबाद रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याने अपघाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. भरधाव गाड्या चालविणा-यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande