द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या अनौपचारीक कसोटीत सिराज-कुलदिपच्या कामगिरीकडे लक्ष
बंगळुरु, 5 नोव्हेंबर (हिं.स.)भारत अ संघाचा कर्णधार ऋषभ पंतने पहिल्या सामन्यापासून आपला फॉर्म आणि फिटनेस कायम ठेवण्याचे ध्येय ठेवेल. दरम्यान, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव सारखे क्रिकेटपटू टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध
कुलदिप यादव


बंगळुरु, 5 नोव्हेंबर (हिं.स.)भारत अ संघाचा कर्णधार ऋषभ पंतने पहिल्या सामन्यापासून आपला फॉर्म आणि फिटनेस कायम ठेवण्याचे ध्येय ठेवेल. दरम्यान, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव सारखे क्रिकेटपटू टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या चार दिवसांच्या सामन्यात आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतील.

ऋषभ पंतने गेल्या आठवड्यात बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात कोणतीही अडचण न येता विकेटकीपर म्हणून १३९.३ षटके खेळली होती. तसेच फलंदाज म्हणून १३३ चेंडूंचा सामना केला. दुसऱ्या डावात ९० धावा करून त्याने आपला फॉर्म काम राखला होता. आता १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी तो पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची जादू दाखवण्यास सज्ज आहे .

भारताने पहिला सामना तीन विकेट्सने जिंकला आणि दक्षिण आफ्रिका आता मालिका बरोबरीत आणण्याचे ध्येय ठेवेल. फलंदाजीच्या दृष्टिकोनातून, दक्षिण आफ्रिका अ संघाच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या शॉर्ट-पिच गोलंदाजीच्या रणनीतीचा चांगला वापर केला. ज्यामुळे पंतसह बहुतेक भारतीय फलंदाजांना त्रास झाला.

भारत अ संघात प्रसिद्ध कृष्णासारखे वेगवान गोलंदाज देखील आहेत आणि आकाश दीप कसोटी संघात परतणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असलेले प्रसिद्ध आणि आकाश यांनी शेवटचा ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात कसोटी सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेबद्दल सांगायचे तर, दुखापतीमुळे अलिकडच्या पाकिस्तान दौऱ्यावर न गेलेला बावुमा आपला फॉर्म परत मिळविण्यासाठी उत्सुक असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande