द.आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर (हिं.स.)दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऋषभ पंतने कसोटी संघात पुनरागमन केले आहे. तर वेगवान गोलंदाज आकाश दीपही दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. पंतला उपकर्णध
ऋषभ पंत


नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर (हिं.स.)दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऋषभ पंतने कसोटी संघात पुनरागमन केले आहे. तर वेगवान गोलंदाज आकाश दीपही दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. पंतला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

या संघात बहुतेक वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सहभागी झालेले क्रिकेटपटू आहेत. करुण नायरकडे पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेले नाही. तो अलिकडेच रणजी ट्रॉफीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दरम्यान, यशस्वी आणि राहुल पुन्हा एकदा डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी घेतील. सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. सुदर्शन, तर देवदत्त पडिक्कल किंवा ध्रुव जुरेल यांना तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते.

संघात अक्षर, कुलदीप, सुंदर आणि जडेजा असे चार फिरकी गोलंदाज आणि बुमराह, सिराज आणि आकाश असे तीन वेगवान गोलंदाज आहेत. नितीश हा वेगवान गोलंदाज अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून संघात आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल, तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. यानंतर, दोन्ही संघ ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळतील, त्यानंतर ९ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल.

भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande