
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी काही नावे आहेत जी केवळ त्यांच्या विक्रमांसाठीच नव्हे तर त्यांच्या आवडी आणि शिस्तीसाठी देखील लक्षात ठेवली जातात. विराट कोहली त्यापैकी एक आहे. आज विराट कोहलीचा ३७ वा वाढदिवस आहे. पश्चिम दिल्लीच्या रस्त्यांपासून ते क्रिकेटचा दिग्गज बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि पुढील १७ वर्षांत त्याने कोणताही क्रिकेटपटू स्वप्नात पाहू शकेल अशा सर्व गोष्टी साध्य केल्या. मग ते एकदिवसीय विश्वचषक, टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर नेणे असो.
विराट आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. गेल्या वर्षी टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने निवृत्ती घेतली होतीय या नंतर त्याने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त घेतली. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये विक्रमांचे इमले रचले. त्याच्या वाढदिवसा निमित्ताने आजवर नोंदवलेल्या त्याच्या विक्रमांचा थोडक्यात लेखाजोखा....
५१ शतकांसह, विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा मान मिळवला आहे. त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला होता.
विराटची एकदिवसीय सरासरी ५७.७ आहे, जी १०,००० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कोणत्याही फलंदाजापेक्षा चांगली आहे. त्याने आतापर्यंत ३०५ सामन्यांमध्ये १४,२५५ धावा केल्या आहेत आणि तो एकदिवसीय इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 7 द्विशतके केली आहेत, ही कामगिरी इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने आतापर्यंत केलेली नाही.
आयपीएल २०१६ मध्ये विराटने खोऱ्यानं धावा केल्या होत्या. त्या हंगामात त्याने ९७३ धावा केल्या आणि एक सर्वकालीन विक्रम प्रस्थापित केला.
पल्या कसोटी कारकीर्दीत त्याला९३७ आयसीसी कसोटी रेटिंग गुण मिळाले होते. जे कोणत्याही भारतीय फलंदाजाने मिळवलेले सर्वोच्च रँकिंग आहे.
२०१४ च्या ऑस्ट्रेलिया मालिकेत चार शतके झळकावून त्याने इतिहास रचला होता. परदेशातील कसोटी मालिकेत भारतीयाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच्या या विक्रमाशी नंतर शुभमन गिलने बरोबरी केली.
विराटच्या नेतृत्वाखाली भारताने सलग नऊ कसोटी मालिका जिंकल्या आणि रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली.
विराट कोहलीने फक्त २०५ डावांमध्ये १०,००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या, ही जागतिक क्रिकेटमधील सर्वात जलद कामगिरी आहे.
५९४ डावांमध्ये २७,००० आंतरराष्ट्रीय धावा, त्याच्या सातत्य आणि तंदुरुस्तीचा पुरावा आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकल्या. त्याने परदेशात विजयांच्या एका नवीन युगाची सुरुवात केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे